शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हातेड येथील जि.प.सदस्यास मारहाण, मात्र गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 21:53 IST

वाळूचे ट्रॅक्टर पकडून देण्याच्या संशयावरून व इतर कामांमध्ये सातत्याने व्यत्यय आणत असल्याच्या संशयावरून जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना मारहाण केली.

जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर पकडून देण्याच्या संशयावरून व इतर कामांमध्ये सातत्याने व्यत्यय आणत असल्याच्या संशयावरून हातेड बुद्रूक, ता.चोपडा येथील रहिवासी तथा भाजपचे जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना हातेड खुर्द व भार्डू दरम्यान असलेल्या नाल्यात २५-३० जणांनी जबर मारहाण केली. मारहाण करताना लाठ्या-काठ्यांंचा वापर झाल्याची चर्चा तालुकाभर सुरू होती. २ रोजी सकाळी ही घटना घडली.या मारहाणीत चुंचाळे-अकुलखेडा गटाचे जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे यांना जबर मुका मार लागला असून, शरीराचे अवयवही फ्रॅक्चर झाल्याचे समजले आहे. चोपडा शहरातील एका खासगी एक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना याबाबत विचारले असता मारहाण झाल्याचे सांगितले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण होऊनही पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला कोणी न आल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून समजले आहे.२ रोजी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान भार्डू-हातेड खुर्द दरम्यान ही मारहाण झाली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये नेमके कोण होते हे गजेंद्र सोनवणे यांनी सांगितले नाही. फिल्मी स्टाईल मारहाण झाल्याची चर्चा तालुकाभर पसरलेली आहे.याबाबतीत गजेंद्र सोनवणे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता मारहाण झाली आहे, मात्र गुन्हा दाखल झाला की नाही, मी दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्या बाबतीत मी सांगू शकत नाही, असे सांगितले.फिर्याद द्यायला कोणीही न आल्याने गुन्हा दाखल नाही- पो.नि. संदीप आराकदरम्यान, या घटनेबाबत ‘लोकमत’ने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या गुन्ह्याबाबत फिर्याद द्यायला कोणीही पुढे न आलेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही, परंतु या मारहाणीत जे साहित्य वापरले आहे ते साहित्य वापरणाºया आरोपींचा शोध घेणे सुरू आहे, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChopdaचोपडा