अडीच हजारांची लाच मागणाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:01+5:302021-07-16T04:13:01+5:30

रावेर : ग्रॅज्युएटीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबादल्यात अडीच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ...

Asking for a bribe of two and a half thousand | अडीच हजारांची लाच मागणाऱ्या

अडीच हजारांची लाच मागणाऱ्या

रावेर : ग्रॅज्युएटीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबादल्यात अडीच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली आहे. रावेर येथे गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

शेख वसीम शेख फयाज (३०, रा.मदिना कॉलनी, रावेर ) असे या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचे वडील रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ग्रॅज्युएटीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये व अर्जित रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ५०० रुपये अशी २५०० रुपये लाचेची मागणी शेख वसीम याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष केली. म्हणून हा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

फोटो

Web Title: Asking for a bribe of two and a half thousand