शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

‘शावैम’व्यतिरिक्त इतरही कोरोना चाचणीची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : बुधवारपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा घणघणणार आहे़ या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले ...

जळगाव : बुधवारपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा घणघणणार आहे़ या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिक्षकांची गर्दी होत आहे. म्हणून या रुग्णालय व्यतिरिक्त इतरही चाचणीची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मनपा आयुक्त व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना केली आहे.

पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना सुरुवात झाल्यानंतर बुधवारपासून दुसरा टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात होईल. सुरक्षित अंतर ठेवूनच विद्यार्थ्यांना बाकांवर बसविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना करण्यात आल्या आहेत.

इन्फो

सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र

कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हाभरातील शिक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संशयित रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचवेळी इतर नॉन कोविड रुग्णांवरही उपचार सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी होऊ नये व शिक्षकांना तपासणी करणे सोयीचे व्हावे म्हणून वैद्यकीय महाविद्यालय व्यतिरिक्त इतर ठिकाणी तपासणीसाठीची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनेचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सोमवारी काढले आहे.

आकडे दृष्टिक्षेपात

१) शिक्षकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजन कोविड चाचणी करण्याचेही आदेश दिले गेले आहेत.

२) जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी ७ हजार ४६५ शिक्षक आहेत तर २ हजार २९८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत़

३) रविवारपर्यंत ३० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली होती.