अर्जुन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:16 IST2021-04-02T04:16:57+5:302021-04-02T04:16:57+5:30

जळगाव : अर्जुन पाटील (७२, रा. पथराड खुर्द, ता. धरणगाव) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार ...

Arjun Patil | अर्जुन पाटील

अर्जुन पाटील

जळगाव : अर्जुन पाटील (७२, रा. पथराड खुर्द, ता. धरणगाव) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एस.टी. महामंडळातील कर्मचारी राजेंद्र पाटील यांचे ते वडील होत.

--

भास्कर जोशी

जळगाव : भास्कर जोशी (६३, रा. भिकमचंद जैन नगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. श्रीपाद जोशी यांचे ते वडील होत.

--

सुपडू कदम

जळगाव : सुपडू कदम (७५, रा. दापोरा) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे.

--

यमुनाबाई भंगाळे

जळगाव : यमुनाबाई भंगाळे (८२, रा. कानळदा) यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या मधुकर भंगाळे यांच्या आई होत.

--

कस्तुराबाई पाटील

ममुराबाद : कस्तुराबाई पाटील (७५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रा.पं. सदस्य भगवान पाटील यांच्या त्या आई होत.

--

पद्माबाई मंडोरा

जळगाव : पद्माबाई मंडोरा यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

--

भानुदास देसाई

जळगाव : भानुदास देसाई (७३, रा. साखरवाडी, संभाजीनगर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मु. जे. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रसाद देसाई यांचे ते वडील होत.

--

रामभाऊ कोचुरे

जळगाव : रामभाऊ कोचुरे (७०, रा. शिवाजीनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रोहन कोचुरे यांचे ते वडील होत.

--

जुबेदाबी पठाण

जळगाव : जुबेदाबी पठाण (६२, रा. अक्सानगर, मेहरुण) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शरीफ बाबा यांच्या त्या आई होत.

--

निवृत्तीनाथ भंगाळे

जळगाव : निवृत्तीनाथ भंगाळे (८८, रा. पारख नगर) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अशोक (राजू) भंगाळे यांचे ते वडील होत.

--

दिलीपराव मगर

जळगाव : दिलीपराव मगर (६९, रा. संभाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

--

बाबूराव जाधव

जळगाव : बाबूराव जाधव (८२) यांचे बुधवारी निधन झाले. संतोष जाधव यांचे ते वडील होत.

--

दिलीप कोळी

जळगाव : दिलीप कोळी (५६, रा. वाल्मिक नगर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. अविनाश कोळी यांचे ते काका होत.

--

रामसिंग पाटील

जळगाव : केंद्रीय जल आयोग, छिंदवाडा (म. प्र.) येथील कर्मचारी रामसिंग पाटील (५९, रा. दहिगाव संत, ता. पाचोरा) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.

--

नारायण शिंपी

जळगाव : भगीरथ इंग्लिश स्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षक नारायण शिंपी (८१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.

--

शशिकला पोतदार

जळगाव : शशिकला पोतदार (७०, रा. गुरुदत्त कॉलनी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. मनोज पोतदार यांच्या त्या आई होत.

--

यशवंत चौधरी

जळगाव : यशवंत चौधरी (८२, रा. आरती अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. भालचंद्र चौधरी यांचे ते वडील होत.

--

Web Title: Arjun Patil