प्रलंबित अर्जावर युक्तिवाद

By Admin | Updated: January 6, 2015 12:54 IST2015-01-06T12:44:15+5:302015-01-06T12:54:09+5:30

उमाळा शिवारातील गोडाऊन मधून ११८ कोटी रुपयांचे केटामाईन जप्त केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी नितीन चिंचोले याच्या अर्जावर १९ रोजी सुनावणी होईल.

Argument on pending application | प्रलंबित अर्जावर युक्तिवाद

प्रलंबित अर्जावर युक्तिवाद

 जळगाव : उमाळा शिवारातील गोडाऊन मधून ११८ कोटी रुपयांचे केटामाईन जप्त केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी नितीन चिंचोले याच्या अर्जावर १९ रोजी सुनावणी होईल. 
न्या.एस.क्यू.एस.एम.शेख यांच्याकडे आज सोमवारी सुनावणी व्हायची होती. पण वेळेअभावी ती होऊ शकली नाही. अनिता चिंचोले यांच्या बँक लॉकरचे सील उघडण्यात यावे, जप्त फॅक्टरीला सुरक्षा व्यवस्था मिळावी, विलास चिंचोले यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, त्यासाठी कारागृह अधीक्षकांना आदेश व्हावेत, अशी मागणी करणारे अर्ज चिंचोले यांच्यावतीने अँड.एस.के. कौल यांनी न्यायालयाकडे केलेले आहेत.

Web Title: Argument on pending application