राज्यात शिरपूर पॅटर्न राबवू
By Admin | Updated: November 5, 2014 14:56 IST2014-11-05T14:56:19+5:302014-11-05T14:56:19+5:30
जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

राज्यात शिरपूर पॅटर्न राबवू
शून्य व्याजाचे कर्ज हवे |
महसूलमंत्री : कुणालाही अडविता येईल पाणी |
जळगाव : जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ------------- राज्य व केंद्र शासन कर्जात बुडालेले आहे. शासनाकडे पैसा नाही. तीन लाख २५ हजार कोटींचे कर्ज राज्य सरकारवर आहे. या स्थितीत शून्य टक्के व्याजाने पैसा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहील. संस्थांचे सहकार्य घेतले जाईल, असेही ते म्हणाले. |