शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

आईला हिनवल्याचा संताप, तलवारीने वार करून एकाचा खून ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST

रावेर : आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी रावेर : शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला हिणवल्याचा राग आल्याने संतापात ...

रावेर : आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

रावेर : शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला हिणवल्याचा राग आल्याने संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर वार करून सोमवारी रात्री जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मंगळवारी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्या जखमी इसमाचा मृत्यू झाला असून, एकच खळबळ उडाली आहे. रावेर पोलिसात संबंधित आरोपींवरील जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ करण्यात येणार असून, रावेर न्यायालयाने सदर आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील संभाजीनगर भागात वास्तव्यास असलेले भाजीपाला विक्रेता राजू देवराम चौधरी (५५) हा आपल्या आईला घोडा बोलून हिणवत असल्याचा राग आल्याने आरोपी रवींद्र संतोष मराठे याने थेट तलवारीने राजू देवराम चौधरी यांच्या डोक्यात वार करत गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सोमवारी रात्री १०: ४५ वाजताच्या सुमारास जखमी राजू देवराम चौधरी यांच्या घरासमोर घडली होती. रक्तबंबाळ झालेल्या जखमी राजू देवराम चौधरी यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करून जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, जळगाव येथे मेंदूवर शस्त्रक्रिया करून औषधोपचार सुरू असताना जखमी राजू देवराम चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खबर मंगळवारी दुपारी ४ वाजता समजल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मयताचा भाऊ गणेश देवराम चौधरी रा. संभाजीनगर यांनी सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी रवींद्र संतोष मराठे यास रावेर पोलिसांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता अटक करून रावेर न्यायालयासमोर हजर केले होते. न्या. ए. एच. बाजड यांनी सदर आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनास्थळी फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, मनोहर जाधव, अनिस शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. खुनाच्या वार्तेने शहरात एकच खळबळ उडाली असून, संभाजीनगर भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.