शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

भुसावळात रिकामटेकड्यांना प्रशासनाकडून ‘अँटीजन’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:33 AM

अत्यावश्यक सेवा वगळता इतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असतानाही गावात तसेच बाजारपेठेत रिकामटेकडे फिरणाऱ्यांची काही कमी होत नसल्याचे चित्र आहे.

भुसावळ : दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत  संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असतानाही गावात तसेच बाजारपेठेत रिकामटेकडे फिरणाऱ्यांची काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. लोक विनंती करून, सांगूनही एकत नाही यामुळे आता प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्यासोबतच रस्त्यावर रिकामटेकडे भटकणाऱ्यांची थेट रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. या अँटीजन चाचणीत जे कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना थेट कोविड सेंटरला दाखल करण्याची धडक मोहीम पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाने सुरू केली      आहे. संपूर्ण भुसावळ विभागातील भुसावळ शहरासह रावेर, यावल, मुक्ताईनगर व बोदवड येथे ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे, तर अँटीजन चाचणी हा काहींच्या चेष्टेचा विषयही झाला आहे.भुसावळात ११३ केसेस केल्याभुसावळ शहरात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध व्यावसायिकांवर शुक्रवारी ११३ केसेस करण्यात आल्या. तसेच ४८ दुचाकीधारकांना दंड आकारण्यात आली. याशिवाय रिकामे फिरणाऱ्या ७५ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात एका पाॉझिटिव्ह निघाला, तर तीन गेल्या दिवसात ५५० जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात ६ जण पाॉझिटिव्ह आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ