शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व विभागाची 'सर्जरी' करणार

By admin | Updated: January 15, 2015 15:05 IST

जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराची माहिती घेण्यात येईल व सर्व विभागाची 'सर्जरी' करून पारदर्शक काम करण्यात येईल. प्रशासन व जनता यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी सोशल साईटस्चा वापर करण्यात येईल.

जळगाव : जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराची माहिती घेण्यात येईल व सर्व विभागाची 'सर्जरी' करून पारदर्शक काम करण्यात येईल. प्रशासन व जनता यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी सोशल साईटस्चा वापर करण्यात येईल. जेणे करुन जनतेच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा होऊन त्यांना न्याय मिळेल. शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांवर आपले विशेष लक्ष असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.लोकाभिमुख कामे करणारबुधवारी दुपारी तीन वाजता पांडेय यांनी डी. एम. मुगळीकर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की संविधानात काम करण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार पडद्याआड राहून काम करण्याला प्राधान्य राहणार आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागात समन्वय घडवून आणून लोकाभिमुख कामे केले जातील. दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर सीईओ पांडेय यांनी सर्व विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली. यानंतर संपूर्ण नवीन इमारतीची पाहणी त्यांनी केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्याकडे लक्ष शिक्षणाच्या बाबतीत जळगाव जिल्हा नकाशावर झळकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्याच्या तक्रारी सोडविण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाला याबाबत सूचना देऊन गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्याचेदेखील नियोजन असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचे स्वागत करताना डी.एम.मुगळीकर. 'ई-धोरण' प्रणाली जिल्हा परिषदेत अनेक नागरिक त्यांची गार्‍हाणी घेऊन दररोज येतात. मात्र, कामाचा ताण अधिकार्‍यांवर अधिक असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निरसन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शासनाची 'ई प्रशासन' व 'ई-धोरण' ही प्रणाली जिल्हा परिषदेत राबविण्यात येणार आहे. नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर केला जाईल.