जळगाव : शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या ११० व्या अ़भा़ व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविडमुळे पुढे ढकलण्यात आले होते़ आता ही परीक्षा १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, अशी माहिती आर. पी. पगारे यांनी दिली आहे.ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण १५ एप्रिलपर्यंत पुर्ण झाले आहे. व त्यांनी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरला असून बीटीआरआय केंद्रात परीक्षा फी जमा केली आहे, अशा सर्व पात्र उमेदवारांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही पगारे यांनी केले आहे.
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा १८ सप्टेंबरपासून आॅनलाईन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:07 IST