कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:25+5:302020-12-03T04:28:25+5:30

चाळीसगाव : कुटुंब कल्याण शस्रक्रिया पार पडल्यानंतर २६ वर्षीय विवाहितेची अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान धुळे येथे मंगळवारी सकाळी ...

After family welfare surgery | कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर

कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर

चाळीसगाव : कुटुंब कल्याण शस्रक्रिया पार पडल्यानंतर २६ वर्षीय विवाहितेची अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान धुळे येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेला मृत्यू झाला आहे. उषा भरत कोष्टी असे या महिलेचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील सासर असलेल्या उषा कोष्टी या विवाहितेची कुटुंब कल्याण नियोजनाची शस्रक्रिया २४ रोजी वाघळी प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती. मात्र महिलेची सोमवारी अचानक प्रकृती बिघडली. तिला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून धुळेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता, मात्र नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: After family welfare surgery