शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात दारु पिण्यास बसल्यावरुन कासोद्यात दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:16 IST

गुन्हा दाखल : १३ जणांना अटक

कासोदा- माझ्या जागेत दारु पिण्यास का बसले याचा जाब विचारुन रिकाम्या बाटल्या उचलायला लावल्याच्या कारणावरुन येथे .५ च्या रात्री दोन गट एकमेकांना भीडले. मोठा जमाव एका इमारती जवळ गोळा झाल्याने तणाव वाढला होता,मात्र तात्काळ पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला आहे.दोन्ही गटांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल होऊन १३ जणांना अटक करण्यात आली आहे.५ रोजी रात्री तळई रस्त्यावरील शेतात काही जण दारू पीत बसले होते,शेतमालक वाल्मिक देविदास समशेर यांनी त्यांना हटकले व दारुच्या रिकाम्या बाटल्या उचलून फेकावयास लावल्या, आम्ही ज्या बाटल्या पिलो त्याच फेकू,आधीच्या पडलेल्या फेकणार नाही, यावरुन वाद वाढला व वादाचे रुपांतर मारामारीत झाले. हा वाद पुन्हा घरी आल्यावर वाढला पण यावेळी समशेर यांच्या इमारतीजवळ मोठा जमाव जमला. इमारतीच्या दरवाजा व खिडक्यांंना दगड मारुन काचा फोडल्या, यावरून गावात अफवा पसरल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वाल्मिक देविदास समशेर यांच्या फियार्दीवरून भादंविक १४३, १४७, १४९, ३३६, ३२३, ५०४, ४२७, १८८,सह जमावबंदीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन इरफान मन्सूफ खान,अजमल मुक्तार खान,सह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इरफान खान मुन्सब खान यांच्या फियार्दीवरून वाल्मिक देविदास समशेर, गणेश बाबूलाल अहिरे सह एकूण ५ जणांना अटक केली आहे. सहाय्यक फौजदार सहदेव घुले व पो.नाईक युवराज कोळी हे पुढील तपास करीत आहेत.या घटनेनंतर चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी घटनास्थळी भेंट देऊन शांतता समितीची तातडीने बैठक घेतली. यावेळी एपीआय रवींद्र जाधव,पीएसआय नरेश ठाकरे, हिंमत पाटील, भैय्या राक्षे,रवींद्र चौधरी मुक्तार पंजाबी,समद कुरेशी सह काही नागरिकांशी संवाद साधला व शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे.पण दारुमुळे जर संपूर्ण गावाची शांतता धोक्यात येत असेल तर संबंधीतांनी जास्त कठोर होणे गरजेचे आहे, अशी चर्चा गावात होत आहे.