शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीपुस्तकावरील वर्गोन्नत उल्लेखाने मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशाच बऱ्याच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नाही. परिणामी, राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने घेतला. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख असणार आहे.

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. संपूर्ण शैक्षणिक वर्ष उलटले, पण इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा उघडल्या नाहीत. इतर वर्गांना सुरुवात झाली. मात्र, तेही एक ते दीड महिना. त्यानंतर पुन्हा कोरोनाची लाट आल्यामुळे शाळा बंद झाल्या. परिणामी, वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्‍याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वर्गोन्नतचा उल्लेख असणार आहे.

विद्यार्थिसंख्या-

इयत्ता पहिली

मुले : ४०,६३४

मुली : ३५,८८०

=========

इयत्ता दुसरी

मुले : ४२,३६६

मुली : ३६,९४७

=========

- इयत्ता तिसरी

मुले : ४२,७५४

मुली : ३५,१६४

=========

- इयत्ता चौथी

मुले : ४३,७६७

मुली : ३६,२८३

=========

प्रगतीपुस्तक बदलणार

प्रगतीपुस्तकावरसुद्धा बदल झालेले पालकांना पाहायला मिळणार आहे. वर्षभर विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्यामुळे उपस्थिती, दिवस, उंची, वजन, तसेच श्रेणी आदी उल्लेख प्रगतीपुस्तकावर नसणार. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, त्यांच्या प्रगतीपुस्तकावरसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कुठल्या पद्धतीने उत्तीर्ण केले त्याचा उल्लेख असेल.

=========

- विद्यार्थी प्रतिक्रिया

मध्यंतरी शाळा उघडल्या होत्या. पहिली ते चौथीच्या वर्गांनासुद्धा लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या. घरात अभ्यास कमी होतो.

- अक्षय माळी, विद्यार्थी

========

स्वाध्याय उपक्रम छान आहे. नियमित त्या उपक्रमात सहभाग नोंदवितो; पण मागील आठवड्यात प्रश्न उपलब्ध झाले नाहीत. आता घरात बसूनसुद्धा कंटाळा आलाय. संसर्गाचे प्रमाण कमी होताच शाळा सुरू करण्‍यात याव्यात.

- संदीप पाटील, विद्यार्थी

=======

आता शाळांना सुट्या जाहीर झाल्या आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रम घ्यावेत. वर्षभर शाळा बंद असल्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला आहे.

- हर्षल सोनवणे, विद्यार्थी