शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

खरा इतिहास समाजासमोर यावा- अभिनेते राहुल सोलापुरकर

By admin | Updated: July 3, 2017 17:11 IST

आजच्या संगीतात शब्दांची किंमत कमी झाली

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.3 - महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. मात्र दुदैव असे की तो आपल्या सोयीनुसार मांडला जातोयं.  जनतेसमोर खरा इतिहास आला पाहिजे. तसेच ब्राrाण व ब्राम्हणेत्तर वादही अत्यंत चुकीचा आहे. या वादामुळे समाजात दरी पडत असल्याचे मत  प्रसिध्द सिने अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी येथे व्यक्त केले. 
व.वा. वाचनालयाच्या 140 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित  ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमासाठी ते शहरात आले असता, त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. 
यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटातील जुनी गाणी व आजच्या गाण्यांमध्ये झालेला बदल, देव आनंद, दिलीपकुमार, राज कपूर या सुपरस्टार्स यांचा सुवर्णमयी कालखंड, शंकर-जयकिशन, नौशाद, गुलजार व जावेद अख्तर या गीतकार-संगीतकार विषयीची माहिती व छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, पेशवा बाजीराव यांचे कतरुत्व तसेच इतिहासाविषयी सुरु असलेले वाद-प्रतिवाद या विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
बौध्दीकदृष्टया समाज सक्षम झाला पाहिजे
सोलापुकर म्हणाले की,  बौध्दीकदृष्ट्या समाज सक्षम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत झाला की जाती-पातीच्या  सर्व भिंती गडून पडतात. मात्र आज तसे होताना दिसत नाही. पाठय़पुस्तकांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठ रितेश देशमुख या अभिनेत्याचा धडा शिकविला जातो. त्यामुळे आजच्या पिढीला आपण काय शिकवित आहोत याबाबत विचार करण्याची गरज आहे. 
जुन्या गाण्यांचे गारुड आजही कायम
आजच्या काळातील संगीतकार चांगले संगीत निर्माण करत आहेत. मात्र 70 च्या काळातील संगीतात ज्या प्रकारे शब्दांची किंमत होती ती किंमत आजच्या संगीताला राहिली नसल्याची खंत सोलापुरकर यांनी व्यक्त केली. हल्ली अनेक नवीन चित्रपटांमध्ये जुनी गाणी नव्याने ‘रिमीक्स’ करून ऐकविली जात आहे. यावरून जुन्या गाण्यांचे गारुड आजही कायम असल्याचे सिद्ध होते.