रावेर हत्याकांडातील आरोपीस ९ दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 00:25 IST2020-10-24T00:21:48+5:302020-10-24T00:25:01+5:30

चौघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी अटक केलेला आरोपी महेंद्र सीताराम बारेला यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

Accused of Raver murder remanded in police custody for 9 days | रावेर हत्याकांडातील आरोपीस ९ दिवस पोलीस कोठडी

रावेर हत्याकांडातील आरोपीस ९ दिवस पोलीस कोठडी

रावेर : बोरखेडा रस्त्यालगतच्या एका १४ वर्षीय पीडितेवर अत्याचार करून तिच्यासह चौघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी अटक केलेला आरोपी महेंद्र सीताराम बारेला (१९) यास शुक्रवारी भुसावळ येथे अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत ९ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
रावेर शिवारातील बोरखेडा रस्त्यालगतच्या शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या केळीबागेतील रखवालदाराच्या घरात रात्री झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर आरोपी महेंद्र सीताराम बारेला याने अत्याचार केले. त्यासोबतच शहरातून दारू पिवून आलेल्या पीडितेच्या ११ वर्षीय भाऊ राहुल याने त्याच्या पाठोपाठ अनिल (वय ९) व चि. सुमन उर्फ नाणी (वय ५) यांनी प्रतिकार करून विरोध केला. याचा राग येवून आरोपी महेंद्र बारेला याने त्या तिघांसह १४ वर्षीय पीडितेचा खून करून अंगावर शहारे आणणारे बालहत्याकांड केल्याची घटना गत गुरुवारी रात्री घडली होती.
दरम्यान, आरोपी महेंद्र बारेला यास विशेष पोलीस तपास पथकाचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात आज हजर केले. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अ‍ॅड.सत्यनारायण पाल यांनी आरोपीचे वकीलपत्र सादर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा अतिरिक्त न्यायाधिश डोरले यांनी आरोपीस नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे हे हजर होते.

Web Title: Accused of Raver murder remanded in police custody for 9 days