शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

उमवित विद्यार्थिनीवर अत्याचार!

By admin | Updated: October 9, 2014 14:56 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकत असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने औरंगाबादच्या युवकाने एका विद्याथिर्नीवर विद्यापीठातच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकत असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने औरंगाबादच्या युवकाने एका विद्याथिर्नीवर विद्यापीठातच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली असून पाळधी पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध 'अदखल'पात्र गुन्हा नोंदविला आहे. या कटातील आरोपीच्या मैत्रिणीला पोलिसांनी समज दिली असून विद्यापीठाने तिच्यावर निलंबनाचे अस्त्र उगारले आहे. आरोपी युवक औरंगाबाद विद्यापीठात संशोधन करीत असून तो मूळचा दुबईचा आहे. त्याची एक मैत्रीण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयाच्या शाखेत उच्च शिक्षण घेत आहे. या मैत्रिणीने तिच्या मित्राची वसतिगृहातील काही विद्यार्थिनींशी ओळख करून दिली आणि जवळीक साधण्यासाठी ती महत्त्वाची दुवा ठरत गेली. या युवकाने विद्यार्थिनींशी जवळीक साधत सोशल मीडियाच्या माध्यमातून युवतींचा विश्‍वास जिंकला. मोबाइलवरून फोटोसेशनसह वाढदिवसाच्याही पाटर्य़ा देत त्याने युवतींच्या वतरुळात जागा मिळविली. त्यातून हेरलेल्या एका युवतीला विद्यापीठातील एका खोलीत नेत त्याने रात्रभर अत्याचार केला आणि वाच्यता केल्यास बदनामीची धमकीही भरली. सोबत पीडित युवतीच्या अन्य मैत्रिणींनाही त्याने धमक्या द्यायला सुरुवात केली. मैत्रिणींना अत्याचाराची घटना कळताच त्या सामूहिकपणे कुलगुरूंना भेटल्या आणि विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. कुलगुरू सुधीर मेश्राम यांनी गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईची सूत्रे हलविली. पीडित युवतीसह आरोपी युवक, त्याच्या मैत्रिणीला पाळधी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपीवर कारवाई करून त्याच्या मैत्रिणीला समज देण्यात आली आहे.

---------------
प्रकार धक्कादायक आहे. मी त्याबाबतीत गंभीर आहे. संबंधित विद्यार्थिनीवर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे. -डॉ.सुधीर मेश्राम, कुलगुरू 
---------------
उमवि मिळालेली माहिती गंभीर असून या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल. -डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक