धक्कादायक! जेलमध्ये एका कैद्यावर चौघांकडून लैंगिक अत्याचार; चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल

By Ajay.patil | Published: July 26, 2023 06:23 PM2023-07-26T18:23:34+5:302023-07-26T18:23:53+5:30

या प्रकरणी चार बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A prisoner was sexually assaulted by four in jail A case has been filed against four bans | धक्कादायक! जेलमध्ये एका कैद्यावर चौघांकडून लैंगिक अत्याचार; चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक! जेलमध्ये एका कैद्यावर चौघांकडून लैंगिक अत्याचार; चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

जळगाव: जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेल्या एका बंदीवर त्याच्या बॅरेकमध्ये असलेल्या इतर बंदीनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या बंदीच्या गळ्यावर धारदार पट्टीने वार करत, या घटनेची माहिती दिल्यास बंदीला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे. या प्रकरणी चार बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून एका खुनाच्या गुन्ह्यात एक २६ वर्षीय संशयित आरोपी युवकाला ठेवण्यात आले आहे. तो युवक असलेल्या कारागृहातील १ व २ बॅरेकध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम व विजय ऊर्फ राणा दिलीप चव्हाण या बंदींनीदेखील ठेवण्यात आले होते. १२ जुलै रोजी २६ वर्षीय बंदी असलेल्या युवकाला बाथरूममध्ये घेऊन जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याला याबाबत वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

नकार दिल्याने लोखंडी पट्टीने केले गळ्यावर वार
रात्री चार बंदींनी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर, त्याच दिवशी पहाटे पुन्हा तो युवक झोपलेला असताना, विकी शिंदे या बंदीने त्याला उठवित त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्याला नकार दिला. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, तरीही नकार दिल्यामुळे इतर चार बंदींनी त्या युवकाच्या गळ्यावर लोखंडी पट्टीने वार करत, त्याला जखमी केले. त्यानंतर घाबरून तो युवक गळ्याला कापड लावून झोपून गेला. २० जुलैला झालेल्या घटनेची माहिती इतर बंदींनी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून त्या पीडित बंदीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.

Web Title: A prisoner was sexually assaulted by four in jail A case has been filed against four bans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.