शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

धक्कादायक! चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 6:05 PM

चाळीसगाव येथे वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. 

जिजाबराव वाघचाळीसगाव (जळगाव) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. शेतात काम करणाऱ्या इतर महिला बचावल्या आहेत. आबा शिवाजी चव्हाण ( ४५)  आणि दीपक आबा चव्हाण अशी या मृत बापलेकांची नावे आहेत. 

शुक्रवारी दुपारी २ वाजता अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दीपक व पत्नी इतर महिलांसोबत सकाळीच शेतात कपाशीला खत देण्यासाठी गेले होते. दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने ते शेवग्याच्या झाडाखाली थांबले. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. यात बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बाकिच्या महिला थोडक्यात बचावल्या असून ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

एकाच दिवशी दोन दुर्घटनाचाळीसगावात आज एकाच दिवशी दोन दुर्घटना घडल्या आहेत. चाळीसगावातीलच खडकी बु. येथे डोहात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सौरव सचिन मोरे (वय १७) याचा बुडून मृत्यू झाला. तर वाघळी येथे वीज पडल्यामुळे रमेश बाबुराव पाटील यांच्या मालकीचा  बैल ठार झाला आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊसDeathमृत्यू