जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:41+5:302021-08-19T04:22:41+5:30

जळगाव - पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ८०.७ मिमी पाऊस ...

50 mm rainfall recorded in the district | जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद

जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद

जळगाव - पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ८०.७ मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला आहे. सर्वात कमी २८.८ मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात तालुकानिहाय जूनपासून आजपर्यंत (१८ ऑगस्ट) पर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये कंसात (जून ते आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी) - जळगाव तालुका- ३१५.३ मिलिमीटर (६६.१ टक्के), भुसावळ- २९२.२ मि.मी. (६९.६), यावल- २९२ मि.मी. (६५.५), रावेर-३२४.६ मि.मी. (७६), मुक्ताईनगर- २४७.२ मि.मी. (६५), अमळनेर- २६२.२ मि.मी. (६५.३), चोपडा- २३३.४ मि.मी. (५०.७ टक्के), एरंडोल- ४०६ मि.मी. (९६.१), पारोळा- ४७३.९ मि.मी. (११३.७३), चाळीसगाव- ४२७.७ मि.मी. (१०९.१), जामनेर- ३६६.९ मि.मी., (७८.७), पाचोरा- ३६४.३ मि.मी. (८५), भडगाव- ३५५.७ मि.मी. (८४.८) धरणगाव-३८८.८ मि.मी. (७३.४), बोदवड-३१८.६ मि.मी. (७३) याप्रमाणे जिल्ह्यात ऑगस्टपर्यंतच्या सरासरीच्या एकूण ३३३.४ मि.मी. म्हणजेच ७८.१ टक्के इतका पाऊस पडल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Web Title: 50 mm rainfall recorded in the district