शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे अनुदान रखडल्याने घरकुलांचे २०० लाभार्थी पावसाळ्यात उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 15:51 IST

रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४० हजारांच्या अनुदानात ओट्याच्या पातळीपर्यंत बांधकाम झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांपासून प्रत्येकी ६० हजार रु. अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलेलाभार्र्थींनी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना घातला घेराव६० हजार रुपयांप्रमाणे १ कोटी २० लाख रुपये अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला दोन-तीन दिवसांत प्रश्न मार्गी लागणार - मुख्याधिकारी

रावेर, जि.जळगाव : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४० हजारांच्या अनुदानात ओट्याच्या पातळीपर्यंत बांधकाम झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांपासून प्रत्येकी ६० हजार रु. अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला असल्याने शहरातील गरजू व गरीब लाभार्र्थींचा संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या लाभार्थींचा प्रत्येकी ४० हजार रू. अनुदानाचा आठ लाख रुपयांचा पहिला टप्पा रावेर पालिकेला प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांनी आपला तोडका मोडकळीस आलेला निवारा तोडून नवीन घरकुलांची मुहूर्तमेढ रोवली.दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र गत चार ते पाच महिन्यांपासून या घरकुलांचे बांधकाम पायाभरणी करून ओट्याच्या समतल येवून, दुसऱ्या प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे १ कोटी २० लाख रुपये अनुदानाचा दुसरा टप्पा रखडला आहे. यामुळे संबंधित लाभार्र्थींचा संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंबंधी शिवसेनेतर्फे रावेर पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, तर संबंधित लाभार्र्थींनी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे हे रावेर दौºयावर असताना संबंधित गरजू लाभार्थींनी रावेर पालिकेच्या बहुउद्देशिय सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांना घेराव घालून त्यांचे लक्ष वेधले होते.त्याप्रसंगी आमदार जावळे यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याकडून माहिती जाणून घेत थेट म्हाडाचे मुख्य कार्यकारी अभियंता मुगलीकर यांच्याशी संपर्क साधून तातडीने ही समस्या धसास लावण्याचे आश्वासन दिले आहे.रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकूल लाभार्र्थींना प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे रावेर पालिकेचा १ कोटी २० लाख रुपये अनुदानाचा दुसरा टप्पा म्हाडाकडे रखडला आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी म्हाडाचे कार्यकारी अभियंता मुगलीकर यांच्याशी संपर्क साधला. दोन-तीन दिवसांत तो प्रश्न मार्गी लागणार आहे. - रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, रावेर

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर