शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्रशासन, खासगी संस्था चालकांमध्ये जुंपली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:03 IST

जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.राज्यातील प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग शासनस्तरावरून मान्य करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका आदी शाळांमध्ये या वर्गांना जोडण्याची मान्यता देण्यात आली. मात्र खासगी संस्था व प्रशासन यांच्यामध्ये वर्ग उघडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बहुतांश विद्यार्थी ५ वी ते ८ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत असल्याने संस्थेकडे प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे. यामुळे संस्थेतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. असे असतानाही शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग नियम बाह्य सुरु केले आहे. याचा परिणाम खाजगी संस्थांमधील विद्यार्थ्यांवर होत आहे. विद्यार्थी खाजगी संस्थांमधील प्रवेश काढुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहे.याबाबत प्रशासनाला आतापर्यंत २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. जिल्हा परिषद शाळेचे ५ वी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी खाजगी शाळेच्या शिक्षकांनी केली आहे.यासाठी काही दिवसांपूर्वीच जि.प.समोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन व संस्था चालकांमध्ये चांगली जुपली आहे.५ वी, ८ वीचे वर्ग सुरु करण्यावर निर्बंधशालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५ वी व आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी निर्बंध घातले आहे. जिल्हा परिषद अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी व ८ वी वर्ग करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राहणार आहे. पूर्वीप्रमाणे या वर्गांना सरसकट मान्यता देता येणार नाही. त्यासाठी विविध बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.जि.प. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी किंवा ८ वी वर्गासाठी पटसंख्येचे निर्बंध घालण्यात आले आहेत. ५ वी वर्गासाठी किमान ३० व ८ वीसाठी किमान ३५ पटसंख्या आवश्यक आहे. तरच ५ वी व ८ वीचे वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात येईल. तसेज वर्ग मान्यता देण्यासाठी वर्गखोली उपलब्ध असण्याची भौतिक अट, आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.काय सांगतो नियम१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. परंतु, तरीही शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग दिले आहेत.

टॅग्स :SchoolशाळाJalna z pजालना जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र