शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंठा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

साळुंके यांचे यश भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील अमोल सांडू साळुंके यांनी एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक ...

साळुंके यांचे यश

भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील अमोल सांडू साळुंके यांनी एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादित केले आहे. ते २००७ पासून औरंगाबाद पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. या यशाबद्दल साळुंके यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी

जालना : तालुक्यातील माळशेंद्रा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीच्या काळात गोंधळ घालून दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर सरपंच आनंद म्हस्के, शिवाजी जाधव, रामेश्वर जाधव, नारायण जाधव, गंगाधर जाधव, राजू म्हस्के, संजय म्हस्के, बालूू जाधव, ज्ञानेश्वर जाधव, हरी म्हस्के, कृष्णा लहाने, नवनाथ जाधव, शिवाजी काशीनाथ जाधव आदींची स्वाक्षरी आहे.

स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम

जालना : मिटकॉन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन स्वयंरोजगार विकास प्रशिक्षणास प्रतिसाद मिळाला. युवकांना दालमिल, ऑइलमिल, कृषिप्रक्रिया, दुग्धप्रक्रिया, गांडूळखतनिर्मिती, जैविक तंत्रज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युवकांना स्वत:चा उद्योग आणि कर्ज प्रकरणाची माहितीही तज्ज्ञ प्रशिक्षक, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.