शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

मतदार संख्या १५ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:54 PM

जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजार ७५३ वर गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणूक रणधुमाळीत प्रचाराला वेग आला असून, उमेदवारांच्या शहरी, ग्रामीण भागातील फेऱ्या वाढल्या आहेत. राजकीय उमेदवार, कार्यकर्त्यांसह प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीसाठी कामाला लागली आहे. अंतिम यादीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजार ७५३ वर गेली आहे. यात ८ लाखांवर पुरूष तर ७ लाखांवर महिला मतदारांचा समावेश आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणूक विभागाने अधिकाधिक मतदारांच्या नोंदी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंत्रणेच्या प्रयत्नानंतर अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजार ७५३ वर गेली आहे. यात ८ लाख १७ हजार ७३५ पुरूष व ७ लाख ३८ हजार १६ मतदारांचा समावेश आहे. तर दोन तृतीय पंथीय मतदारांचीही नोंदणी करण्यात आली आहे.गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १३ लाख ८९ हजार ३३ इतके मतदार होते. यात ७ लाख ३६ हजार ६५२ पुरूष तर ६ लाख ५२ हजार ३८१ महिला मतदारांचा समावेश होता.मागील पाच वर्षात निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमातून ही मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजारांवर गेली असून, गत निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ६६ हजार ७२० मतदार वाढले आहेत. युवकांच्या मतदानात वाढ झाली असून, युवकांचे हे मतदान आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांनीही निवडणूक रणधुमाळीत प्रचार यंत्रणा जोमात राबविली आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेली विकास कामे तर विरोधकांनी मतदार संघातील प्रश्नांना हात घालून आपल्या विजयासाठी रणनीती आखली आहे. राजकीय पक्षाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेचे कामकाजही अहोरात्रपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस यंत्रणाही सज्ज आहे.८१ हजार पुरूष तर ७३ हजार महिला मतदारांचा समावेशजिल्ह्यात एकूण १५ लाख ५५ हजार ७५३ मतदार आहेत. यात परतूर मतदार संघात १ लाख ५५ हजार ६३७ पुरूष, १ लाख ४० हजार ५२९ महिला मतदार आहेत. घनसावंगी मतदार संघात १ लाख ६२ हजार ५०२ पुरूष तर १ लाख ५० हजार २२१ महिला मतदार आहेत. जालना विधानसभा मतदार संघात १ लाख ७७ हजार १९६ पुरूष तर १ लाख ५६ हजार १५१ महिला मतदारांचा समावेश आहे. तर दोन तृतीयपंथीय मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.बदनापूर मतदार संघात १ लाख ६१ हजार ५६६ पुरूष तर १ लाख ४४ हजार ८७५ महिला मतदार आहेत. तर भोकरदन विधानसभा मतदर संघात १ लाख ६० हजार ८३४ पुरूष व १ लाख ४४ हजार ८७५ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेषत: गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत युवा मतदारांची संख्या वाढली आहे. युवकांचे वाढलेले मतदान आपल्याच पारड्यात पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न चालविले आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान