शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानपत्र वाटप करणारा विजय भोंबे बनला फौजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

जळगाव सपकाळ : कष्ट करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आडगाव भोंबे (ता. भोकरदन) ...

जळगाव सपकाळ : कष्ट करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आडगाव भोंबे (ता. भोकरदन) येथील विजय भोंबे हा फौजदार झाला आहे. कष्टातून यशाला गवसणी घालणाऱ्या विजय भोंबे याचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला.

आडगाव भोंबे येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विजय पांडुरंग भोंबे हा दहा वर्षांपूर्वी जळगाव शहरात शिक्षणासाठी गेला. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने घरोघरी पेपर वाटण्याचे काम केले. पोलीस खात्यात नोकरी करायची हे ध्येय उराशी बाळगू विजय भोंबे याने तयारी सुरू केली. विजयने जिद्द चिकाटी आणि मेहनतीने हे यश खेचून आणले. २०१७ ची पीएसआयची परीक्षा विजयने दिली. त्याच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा टप्प्यावर विजयने यश मिळविले. मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य हे यशाचं गमक असल्याचे तो सांगतो. आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, पत्नी, बहीण, कुटुंबातील सदस्यांसह मित्रपरिवाराला जात असल्याचेही त्याने सांगितले. फौजदारपदी निवड झाल्याबद्दल विजय भोंबे याचा आडगाव भाेंबे येथे सरपंच कौशल्याबाई भोंबे, उपसरपंच रामकृष्णा भोंबे, चेअरमन सारंगधर भोंबे, रोकडोबा महाराज संस्थानचे अध्यक्ष संतोषराव भोंबे व ग्रामस्थांनी जंगी स्वागत करून सत्कार केला.

गावात २०० वर सरकारी कर्मचारी

पाच हजार लोकसंख्या असलेल्या आडगाव भोंबे येथील २०० हून अधिक युवक शासकीय नोकरीत आहेत. येथील उत्तमराव भोंबे लेफ्टनंट कर्नल तर पाच वर्षांपूर्वी नंदकिशोर भोंबे सहायक उपायुक्त झाले आहेत. तर २७ युवक सैन्य दलात असून, एक विस्तार अधिकारी, तीन ग्रामसेवक, २० शिक्षक आहेत. तर १० जण शाखा अभियंता व इतर काही प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत.

फोटो