शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:22 IST

भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

जालना : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सिंदखेडराजा मार्गावरील माळाचा गणपतीजवळील वळण रस्त्यावर सोमवारी सोमवारी रात्री झाला.या अपघातात योगेश पंढरीनाथ बडदे (२५ रा. जामवाडी) भोला खरात (रा. कन्हैय्यानगर) हे दोघे ठार तर मुकेश रघुनाथ वाघ (रा. जामवाडी) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश व मुकेश हे दोघे रोहित्र बसवण्याचे काम करत, या कामासाठी ते सोमवारी सिंदखेडराजा येथे गेले होते.काम संपल्यानंतर ते रात्री दुचाकीवरून (क्र. एमएच २१, बीएन ४२८२) घरी येत होते. धारकल्याण फाट्याजवळ त्यांची कन्हैय्यानगर येथील भोला खरात याच्यांशी भेट झाली. ओळखीचा असल्यामुळे त्यांनी भोला खरात याला कन्हैय्यानगर येथे सोडण्यासाठी दुचाकीवर सोबत घेतले. तिघेही जालना शहराकडे येत असताना हा अपघात झाला. माळाच्या गणपतीजवळ खालच्या बाजूने असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला उडवले. यात दुचाकी चालवत असलेल्या योगेश बडदेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला. अपघाताची घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी जखमी मुकेश व भोला यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना भोला खरात याचाही मृत्यू झाला. यातील मुकेशची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी सांगितले. अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू