अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST2019-01-14T00:52:54+5:302019-01-14T00:53:18+5:30
अंबड तालुक्यातील गोरी- गंधारी येथील गोदावरी पात्रातून आरीअटॅच ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यातून अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी रविवारी सायंकाळी पकडला

अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला
शहागड : अंबड तालुक्यातील गोरी- गंधारी येथील गोदावरी पात्रातून आरीअटॅच ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यातून अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी रविवारी सायंकाळी पकडला आहे.
नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहितीवरून पोलीस पथकाने गोदावरी नदीच्या पात्रात छापा टाकला असता आरीअटॅच टॅक्टर पाण्यातून अवैधवाळू उपसा करून नदी काठी साठवत असल्याचे आढळून आले. यानंतर अवैधवाळू तस्कर ट्रॅक्टर सोडून पसार झाला.
दरम्यान पोलिसांनी अवैधवाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र, ट्रॅक्टर असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून शहागड पोलीस चौकीत जमा केला आहे. ही कारवाई एपीआय अनिल परजने, उपनिरीक्षक हनुमंत वारे, पो. कॉ. गणेश लक्कस, ज्ञानेश्वर मराडे, पो. कॉ. महेश तोटे, बाबा डमाळे, सहाय्यक फौजदार सय्यद नासीर, जमादार अख्तर शेख यांनी केली.