शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वडीगोद्रीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:48 IST

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रविवारी पहाटेच्या सुमारास रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रविवारी पहाटेच्या सुमारास रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन दुकाने व बंद घर फोडून मुद्देमाल लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे.वडीगोद्री येथील औरंगाबाद- बीड राष्ट्रीय महामार्गावर विठाई कॉम्प्लेक्समध्ये रविवारी पहाटे चोरट्यांनी प्रथम बाहेर लावलेले सर्व बल्ब फोडले. इलेक्ट्रीकल व गुरुकृपा मेडीकल या दोन्ही दुकानांचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. दोन्ही दुकानांच्या गल्ल्यातील चिल्लर लंपास केली. तसेच गुरुकृपा मेडिकलमध्ये नेण्यायोग्य काही सापडले नसल्यामुळे चॉकलेटवर चोरट्यांनी ताव मारला. तर समर्थ इलेक्ट्रीकल दुकानातील सहाशे ते सातशे रुपये चिल्लर, मोबाईल हेडफोन व ब्ल्यूटूथ लंपास केले.तसेच अशोक नारायण आटोळे यांचे घर फोडले. त्यानंतर चोरट्यांनी अंतरवाली सराटी शिवारातील नाकोडा कलेक्शनच्या बाहेरील बल्ब फोडले. दुकानाचे शटर हात लावायच्या अगोदर दुकानाच्या आतमधील बांधलेले कुत्रे भुंकायला लागले आणि कुत्राच्या भुंकण्याच्या आवाजाने दुकान मालक जागे झाले. ही बाब लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. तसेच अंतरवाली सराटी येथील देशी दारूचे दुकान फोडून देशीवर ताव मारला. ऐन सणासुदीच्या कालावधीत आणि निवडणूक कालावधीतील रात्रीची गस्त वाढलेली असतानाही चोरट्यांनी वडीगोद्रीत धुमाकूळ घातला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीMarketबाजार