नातेवाईकाच्या लग्नावरून परताना दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नी ठार, पती व मुलगा अत्यवस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 19:25 IST2022-05-19T19:22:54+5:302022-05-19T19:25:00+5:30

पती आणि मुलास अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले आहे.

The couple's tragic accident while returning from a relative's wedding; Wife killed, husband and son in critical condition | नातेवाईकाच्या लग्नावरून परताना दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नी ठार, पती व मुलगा अत्यवस्थ

नातेवाईकाच्या लग्नावरून परताना दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नी ठार, पती व मुलगा अत्यवस्थ

बदनापूर (जालना): नातेवाईकाचे  देवगाव तांडा शिवारात जालना-औरंगाबाद महामार्गावर पती-पत्नी मुलासह बाईकवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात बाईकवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर आठ वर्षीय मुलगा व पती गंभीर जखमी झाला आहेत.

देऊळगाव घुबे येथील घुबे दाम्पत्य हल्ली औरंगाबाद नजीक रांजणगाव येथे राहते. नातेवाईकाचे लग्न असल्याने रुपराव घुबे हे पत्नी ज्योती आणि मुलगा सर्वज्ञ सोबत गावी आले होते. दुपारी लग्न समारंभ पार पडून तिघेही बाईकवरून (एम एच २० सी के ८३४४ ) औरंगाबादकडे परतत होते. यावेळी बदनापूरपासून जवळ असलेल्या देवगाव तांडा शिवारात जालना-औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. 

या भीषण अपघातात ज्योती रुपराव घुबे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुपराव घुबे आणि मुलगा सर्वज्ञ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार सूर्यवंशी यांनी दिली आहे. सदर घटनेबाबत बदनापूर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

Web Title: The couple's tragic accident while returning from a relative's wedding; Wife killed, husband and son in critical condition