शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam: बदनापूरमध्ये परीक्षा केंद्रावर दगडफेक, पेपर फुटला नसल्याचा प्रशासनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:55 IST

स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे.

जालनाबदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर आज पेपर फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून मात्र, या परीक्षा केंद्रावर पालक वर्गाकडून दगडफेक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रामध्ये एकूण १४ हॉल असून ३२८ विद्यार्थी यांनी आज मराठी विषयाचा पेपर दिला हा पेपर सुरू झाल्यानंतर सुमारे तासाभरापूर्वी हा पेपर बाहेर आल्याचा दावा नागरिकांमधून होत आहे 

आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका केंद्रावर मराठी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या पंधरा मिनिटांतच परीक्षा केंद्राबाहेर आली. त्यानंतर शहरातील झेरॉक्स सेंटरवर प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचे सेट करण्यात आले. हे सेट परीक्षा हॉलमधील विद्यार्थ्यांना चोरट्या मार्गाने पुरवण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र, प्रशासनाने असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

खातर जमा करण्यात येत आहेयाविषयी येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. एन. क्षीरसागर म्हणाले की, या परीक्षा केंद्रावर पेपर फुटलेला नाही. एका हॉलमध्ये बाहेरील जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये खिडकीची काच फुटली आहे. तसेच काही पालकांनी हॉलमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवला. या प्रकाराची शिक्षण विभागाकडून खातर जमा करण्यात येत आहे.

दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाहीआज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

अहवाल मागितला आहेसंबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांच्याकडून तत्काळ अहवाल मागविण्यात येत आहे. स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी तेथे उपस्थित आहेत. दोषींवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. वैशाली जामदार, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ

टॅग्स :ssc examदहावीJalanaजालना