आई-वडिलांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST2021-02-15T04:26:46+5:302021-02-15T04:26:46+5:30

वडीगोद्री : वृद्धाश्रम कमी होण्याऐवजी त्या वाढ होत आहे. वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी युवकांनी आई - वडिलांची सेवा करावी. ...

Serve the parents | आई-वडिलांची सेवा करा

आई-वडिलांची सेवा करा

वडीगोद्री : वृद्धाश्रम कमी होण्याऐवजी त्या वाढ होत आहे. वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी युवकांनी आई - वडिलांची सेवा करावी. घराला मंदिर बनवून कर्तव्य पार पाडावे. आयुष्यात आपल्यासोबत काही येत नाही. केवळ चांगले कर्मच शिल्लक राहतात. ईश्वराकडे भाव असून, तो काही कमी पडू देत नाही, असे हभप भागवत महाराज कणके महाराज यांनी सांगितले.

अंबड तालुक्यातील भामानगर (भांबेरी) येथे ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत भागवत कथा, अंखड हरिनाम सप्ताह‌ाचे आयोजन करण्यात आले आहे होते.

नवनाथा पंथीय असलेले अडभंगनाथ महाराज‌ यांच्या तपोभूमी भामानगर (भांबेरी) मध्ये सुरू असलेल्या भागवत कथेमुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. यावेळी भागवत कथेत कणके महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Serve the parents