खरीप हंगामासाठी घरातील सोयाबीन जतन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:21+5:302021-02-14T04:28:21+5:30

जळगाव सपकाळ : गतवर्षी अनेकांनी नामांकित कंपन्यांचे सोयाबीन खरेदी करून पेरणी केली. परंतु, बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ...

Save indoor soybeans for the kharif season | खरीप हंगामासाठी घरातील सोयाबीन जतन करा

खरीप हंगामासाठी घरातील सोयाबीन जतन करा

जळगाव सपकाळ : गतवर्षी अनेकांनी नामांकित कंपन्यांचे सोयाबीन खरेदी करून पेरणी केली. परंतु, बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ही बाब पाहता आगामी खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीनचे जतन करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील अडगाव भोंबे शिवारातील गटशेतीची जाधव यांनी पाहणी केली. तसेच येथील शेतकरी दामोधर भोंबे यांनी लागवड केलेल्या उन्हाळी सोयाबीनची पाहणीही जाधव यांनी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जाधव, भुते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी फळबाग तज्ज्ञ भगवान कापसे, डाॅ. एस. बी. पवार, कृषी सहायक अंकुश भोंबे, आशा उबाळे, उमेश भोसले, अर्चना बारवाल, नंदा गांवडे, राजेंद्र तळेकर, विष्णू जाधव, एस. एल. सिंनकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Save indoor soybeans for the kharif season