आरटीएसई परीक्षेत संकेत पुंगळे राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:59+5:302021-02-14T04:28:59+5:30

या परीक्षेत दिव्या श्याम सावंत हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रतीक्षा विठ्ठल पुंगळे, माधुरी अनिल पुंगळे यांनी जिल्हास्तरावर ...

Sanket Pungale first in RTSE exam in the state | आरटीएसई परीक्षेत संकेत पुंगळे राज्यात प्रथम

आरटीएसई परीक्षेत संकेत पुंगळे राज्यात प्रथम

या परीक्षेत दिव्या श्याम सावंत हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रतीक्षा विठ्ठल पुंगळे, माधुरी अनिल पुंगळे यांनी जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे. राजूर शाळेला कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालयाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत राणी संजय मोहिते या विद्यार्थिनीला मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सरपंच भाऊसाहेब भुजंग, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल पुंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू टोम्पे, केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, मुख्याध्यापक एकनाथ बाहेकर, वल्लभ गाढे, संतोष दारूवाले, डी.एस.सोनवणे, भिंगोले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : राजूर केंद्रीय प्राथमिक शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सरपंच भाऊसाहेब भुजंग, अनिल पुंगळे, रमेश पुंगळे आदी.

Web Title: Sanket Pungale first in RTSE exam in the state