शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीवर रक्ताचा सडा अन् फुटलेल्या बांगड्या; आठ महिलांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:21 IST

४०० रुपयांच्या रोजंदारीसाठी गेल्या अन् कपाळावर सुतक आलं; समृद्धीवर ८ महिलांचा करुण अंत, पाहा थरारक वास्तव.

जालना : चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर पिकअपला धडकून झालेल्या अपघातातसमृद्धी महामार्गावर रोजंदारीचे काम करणाऱ्या आठ महिलांचा मृत्यू झाला. तर तिघींची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही घटना सोमवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नागपूर - समृद्धी महामार्गावरील कडवंची (ता. जालना) शिवारात घडली.

जालना तालुक्यातील निधोना, बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील महिला नागपूर - समृद्धी महामार्गावर साफसफाईचे काम करण्यासाठी जात होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काम संपल्यानंतर गावाकडे परतण्यासाठी त्या चॅनल क्रमांक ३५२ जवळ पिकअपमध्ये (क्र. एमएच २० - सीटी २४६५) बसल्या. परंतु, त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र. एमएच ४३ - सीई ६३८८) पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात सहा जणींचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी महिलांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत अन् गंभीर जखमींची नावेअलकाबाई दादाराव आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), मीना परमेश्वर आदमाने (४४), सुमनबाई कचरू आदमाने (७०) (सर्व रा. निधोना, ता. जालना), ताराबाई गहिनाजी चौधरी (४५), कडूबाई रामदास मदन (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (४५) (तिघी रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर), मंगलबाई प्रकाश शिनगारे (५५, रा. खादगाव) अशी मयत महिलांची नावे आहेत. तर प्रयागबाई बाबासाहेब वाघ (३०), कविता विठ्ठल चौधरी (३५), दिनेश रंगनाथ गायकवाड अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर रेवती योगेश मदन, कासाबाई मदन या दोघी किरकोळ जखमी झाल्या.

चालकाला नागरिकांनी दिला चोपअपघातानंतर कडवंची व परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेला वाहन चालक प्रकाश राजवर (उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ओळख पटविणेही झाले मुश्कीलअपघातानंतर वाहनातील मृतदेह काढून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले होते. काहींच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांची ओळख पटविणेही मुश्कील झाले होते. समृद्धी महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता.

जमावाला आवरताना कसरतअपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक शिवाजी साळुंके, गोपाळ ठोंबरे, परसुलवाले व एमएसएफचे रवी पवार, सुनील राठोड, मनोज पवार, महामार्ग विभागाचे स.पो.नि. अशोक काळे यांनी प्रथम घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांना बाजूला करताना संबंधितांना कसरत करावी लागली.

होत्याचं नव्हतं झालं...अपघातातील कंटेनर चालक प्रकाश राजवर (वय २५, रा. सुलतानपूर, यूपी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत झोपेची डुलकी लागल्यानेच हा भीषण अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. समृद्धी महामार्गावर चालकांचा थकवा आणि झोप हा चिंतेचा विषय बनला असून, या ७ महिलांच्या मृत्यूने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सख्ख्या जावांसह चुलत सासूवर काळाचा घालाया अपघातातील मयतांमध्ये जालना तालुक्यातील निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने या दोघी सख्ख्या जावा आहेत. तर सुमनबाई कचरू आदमाने या त्यांच्या चुलत सासू होत. घरची आर्थिक परिस्थती नाजूक असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून या दोघी जावा एकमेकींसोबत समृद्धी महामार्गावर रोजंदारीवर काम करण्यासाठी जात होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Highway Tragedy: Eight Women Dead in Horrific Accident

Web Summary : Eight women died, and three were injured on the Samruddhi Expressway near Jalna after a container truck hit their pickup vehicle. The driver fell asleep, causing the deadly collision. The victims were sanitation workers returning from work.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना