शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

'सगेसोयरे' टिकणार नव्हते तर न्यायाधीश घेऊन कशाला आले होते; मनोज जरांगे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:25 IST

लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण बदलायची आहे, असं पुन्हा बेमुदत उपोषणासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले.

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : 'सगेसोयरे' अधिसूचना कोर्टात टिकली नाही तर दुसरा पर्याय राहत नाही, असे मंत्री शंभूराज देसाई माध्यमांसमोर बोलले होते. यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टिकणारच आहे ना, ते टिकणार नाही तर न्यायाधीश कशाला आणले होते? ते टिकणार नाही असं मी म्हणालो होतो, म्हणून तुम्ही न्यायाधीश आणले होते ना? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. तुम्ही म्हणत असाल टिकत नाही, तर आमची मूळ मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ती पूर्ण करा असेही जरांगे म्हणाले.

२० तारखेला बेमुदत उपोषण करू नये, अशी समाजाची भावना आहे. समाजाची माया आहे, प्रेम आहे मी ते कधीच विसरणार नाही. मी त्यांचा शब्द डावलतोय अस नाही. शेवटी त्यांचा शब्द कशासाठी डावलतो यालाही महत्त्व आहे. बेमुदत उपोषण हीच माझी शक्ती आहे. लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण बदलायची आहे, असं पुन्हा बेमुदत उपोषणासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले.

मी काही कोणाची सुपारी घेतली नाहीते प्रत्येक सभेमध्ये माझ्यावर टीका करतात असे, गिरीश महाजन म्हणाले होते, यावर जरांगे म्हणाले, तुम्हाला बोललो होतो. तुमच्याशी आमची नाराजी असण्याचे काही कारण नाही. मी फक्त म्हणलो आरक्षण टिकणार द्यावं, म्हणून त्यांना माझा राग आलेला दिसतो. तुमच्यावर टीका करावी हा माझा धंदा नाही. मी काय कोणाच्या सुपाऱ्या घेत नाही, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी महाजन यांना दिले.

... तर सरकारसोबत चर्चा करूगिरीश भाऊ तुम्हीच ठरवायला होतात. सगेसोयऱ्यासाठी तुम्हीच न्यायाधीश आणले होते. तुम्ही म्हणालात सगेसोयरेची अंमलबजावणी केली तरी टिकणार नाही. म्हणून तुम्ही फक्त खरं बोला. आम्ही पुन्हा तुमच्याशी अंतरवाली सराटीत चर्चा करायला तयार आहोत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकार सोबत चर्चेचे दार खुले असल्याचे संकेत दिले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना