रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:30+5:302021-02-08T04:27:30+5:30

आईसह चार वर्षीय चिमुकला बेपत्ता भोकरदन : भोकरदन तालुक्यातील सुभानपूर येथून १ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या ...

Road safety campaign program | रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम

रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम

आईसह चार वर्षीय चिमुकला बेपत्ता

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील सुभानपूर येथून १ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चिमुकल्यासह आई घरातून न सांगता निघून गेली. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. विठ्ठल विष्णू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझी बहीण पूजा दत्तू वाढेकर (वय २५) व सोबत तिचा चार वर्षीय मुलगा रितेश हे दोघे १ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरातून कोणाला न सांगता सुभानपूर येथून निघून गेले आहेत. याप्रकरणी भोकरदन पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

जालना : सोशल मीडियावर राष्ट्रविरोधी तसेच धार्मिक भावनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास कदीम जालना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. प्रशांत महाजन, पोना. मनोज हिवाळे, पोना. संतोष अंभोरे, पोकॉ. किरण चेके, बाबा गायकवाड, रामेश्वर राऊत, कैलास चेके, पोकॉ. कांगणे आदींनी केली आहे.

Web Title: Road safety campaign program