शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुराजाची चाहूल झाडा-वेलींना लागली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

पळस, आम्रवृक्षांची मनसोक्त उधळण : रान बनले सुवासिक टेंभुर्णी : ‘आला शिशिर संपत, पानगळ सरली... ऋतुराजाची चाहूल झाडा-वेलींना ...

पळस, आम्रवृक्षांची मनसोक्त उधळण : रान बनले सुवासिक

टेंभुर्णी : ‘आला शिशिर संपत, पानगळ सरली... ऋतुराजाची चाहूल झाडा-वेलींना लागली’ या कवितेच्या ओळींची आठवण व्हावी, अशी निसर्गाची मनसोक्त उधळण सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. वसंतला ऋतुराज म्हटले जाते. वसंताच्या स्वागतासाठी जणू सर्व निसर्ग बेचैन झालेला असतो.

वसंत पंचमी झाली की, निसर्गाला ऋतुराजाच्या आगमनाचे वेध लागतात. नुकतीच वसंत पंचमी झाली. एकीकडे शिशिराची पानगळ सध्या सुरू असताना, आगीच्या गोळ्याप्रमाणे लालबुंद दिसणाऱ्या पळस फुलांनी संपूर्ण रान फुलून गेले आहे. त्या फुलांतून रसकंद घेण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांची अलगद किलबिलाट त्यात आणखी जीव ओतत आहे, तर दुसरीकडे जागोजागी मोहराने भरलेल्या आम्रवृक्षांनी संपूर्ण रान सुवासिक करून टाकले आहे. वसंताच्या स्वागतासाठी कुणीतरी सुवासिक धुनी पेटवावी, असा भास सर्वांना होत आहे. त्यातच आम्रवृक्षांच्या फांदीवर बसून सुमधूर आवाज काढणारी कोकिळा जणू वसंत गीत गाऊन सर्वांना मोहीत करीत आहे.

हळूहळू ऊन तापायला लागले असताना, सोंगणी-मळणीच्या कामाने थकून गेलेल्या आमच्या बळीराजाच्या मनाला निसर्गातील ही फुलांची उधळण काही वेळ गारवा देऊन जात आहे. आणखी काही दिवसांत रानावनातून काटेशेवर, पांगारा, रिठा आदी वृक्ष आपल्या मनसोक्त फुलांची उधळण करणार आहे अन् पाहता-पाहता वसंतोत्सवाच्या या रंगात रंगपंचमीचेही रंग फिके पडावे, अशा मनसोक्त रंगांंच्या उधळणीत निसर्ग न्हाऊन निघणार आहे.