जालन्यात राजेश टोपे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:44+5:302021-02-16T04:31:44+5:30

कुंभार पिंपळगाव येथे विविध स्पर्धा घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद सकूलमध्ये रविवारी महिलांसाठी विविध ...

Rajesh Tope felicitated in Jalna | जालन्यात राजेश टोपे यांचा सत्कार

जालन्यात राजेश टोपे यांचा सत्कार

कुंभार पिंपळगाव येथे विविध स्पर्धा

घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद सकूलमध्ये रविवारी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ॲड. कीर्ती उढाण, उपसरपंच रेखा गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संगीत खुर्ची, प्रश्नमंजूषा, भाषण कौशल्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन अशोक जयसिंग यांनी केले, तर आभार अर्चना कंटुले यांनी मानले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

दत्ता लोखंडे यांची अध्यक्षदी निवड

पारध : येथील व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी दत्ता लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी लोखंडे यांना नियुक्तिपत्र दिले. पारध व परिसरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Web Title: Rajesh Tope felicitated in Jalna