पारध येथे निवडणुकीच्या कारणावरून राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST2021-01-21T04:28:54+5:302021-01-21T04:28:54+5:30

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध (बु.) येथे मंगळवारी निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही ...

Radha for election reasons at Pardh | पारध येथे निवडणुकीच्या कारणावरून राडा

पारध येथे निवडणुकीच्या कारणावरून राडा

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध (बु.) येथे मंगळवारी निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील ३७ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका गटातील संध्या नंदकिशोर मोकाशे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून बाळू माणिकराव जाधव, विलास माणिकराव जाधव, शरद माणिकराव जाधव, आकाश बाळू जाधव, राम विलास जाधव, संगीता विलास जाधव, वर्षा बाळू जाधव, नर्मदाबाई माणिकराव जाधव, सुनील दत्तू लोखंडे यांच्यासह बारा ते तेरा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातील वर्षा बाळू जाधव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून संध्या नंदकिशोर मोकाशे, मोहिनी पंकज गरुड, अनुराधा नंदकिशोर मोकाशे, गणेश शिवाजी टाकतोडे, प्रकाश गबाजी जाधव, आशा प्रकाश जाधव, अक्षय प्रकाश जाधव, कृष्णा सुरेश लोखंडे, पवन गुलाबराव लोखंडे, विष्णू सुरेश लोखंडे, प्रमिलाबाई गुलाबराव लोखंडे, नंदकिशोर उत्तमराव मोकाशे, सीमा पवन लोखंडे यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोनि. रमेश जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश सिनकर, कर्मचारी विकास जाधव हे करत आहेत.

Web Title: Radha for election reasons at Pardh