वडीगोद्री येथे ‘गुडघ्याला बाशिंग’ पथनाट्याचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:58+5:302021-02-06T04:55:58+5:30

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे आशिष ग्राम रचना ट्रस्ट, पाचोड यांच्या वतीने ‘गुडघ्याला बाशिंग’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात ...

Presentation of the street play 'Kneeling Bashing' at Wadigodri | वडीगोद्री येथे ‘गुडघ्याला बाशिंग’ पथनाट्याचे सादरीकरण

वडीगोद्री येथे ‘गुडघ्याला बाशिंग’ पथनाट्याचे सादरीकरण

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे आशिष ग्राम रचना ट्रस्ट, पाचोड यांच्या वतीने ‘गुडघ्याला बाशिंग’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या पथनाटिकेत कमी वयात लग्न झाल्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात. तसेच कमी वयात लग्न झाल्याने मुलींना मानसिक व शारीरिक अडचणींना कसे सामोरे जावे लागते. मुलीच्या पालकांनी याबाबत कमीत कमी मुलीचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तरी लग्न करू नये; अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कशी होऊ शकते, याबाबत पथनाटिकेद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती बापूराव खटके, आनंद पवार यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी वैष्णवी पवार, अश्विनी पवार, वैष्णवी गांगुर्डे, कोमल गांगुर्डे, प्रेरणा गांगुर्डे, दीपाली रोकडे, दिशा निकाळजे, स्नेहल काळे, निकिता बेडेकर, आशा कार्यकर्ती रेणुका कुंभकर्ण, भीमा हिवराळे, रूपा टकले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Presentation of the street play 'Kneeling Bashing' at Wadigodri