शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

६५० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

शेषराव वायाळ परतूर : तालुक्यातील रब्बीची पिके बहारात असतानाच महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी तब्बल ६५० रोहित्रांचा वीज ...

शेषराव वायाळ

परतूर : तालुक्यातील रब्बीची पिके बहारात असतानाच महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी तब्बल ६५० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. महावितरणकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हातातोंडाशी आलेली रब्बीतील पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. रब्बी हंगामातही रोगराईसह इतर संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी पिके जगविली आहेत. रब्बीतील गहू, हरभऱ्यासह इतर पिके सध्या बहारात आहेत. या पिकांमुळे चांगले उत्पन्न हाती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, महावितरण कंपनीने अचानक थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील तब्बल ६५० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रोहित्रांवरील कृषी पंप धारक शेतकरी ग्राहकांची संख्या ७ हजारावर आहे. या शेतकऱ्यांकडे जवळपास ४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, गहू, हरभरा, ज्वारी, उसासह इतर पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु, वीज पुरवठा खंडित झाल्याने या पिकांना पाणी देता येत नाही. अगोदरच शेतकरी अस्मानी संकटांनी हैराण झालेले आहेत. त्यात आता महावितरण कंपनीकडून कारवाईचा शॉक दिला जात आहे. या कारवाईमुळे आणि उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून ही पिके जगविली आहेत. परंतु, महावितरणच्या या कारवाईमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत असून, वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

कोट

थकीत वीज बिल वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे नाइलाजाने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहेे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेनुसार ५० टक्के वीज बिल भरले तर त्यांचे उर्वरित बिल कृषी धोरणांतर्गत माफ होणार आहे.

एन. व्ही. बेंडळे, उपविभागीय अभियंता, परतूर