नगरपंचायतचा वाजणार नगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:44+5:302021-02-07T04:28:44+5:30

मंठा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय आरक्षण अंतिमरीत्या जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी १५ ...

Nagar Panchayat's bell will ring | नगरपंचायतचा वाजणार नगारा

नगरपंचायतचा वाजणार नगारा

मंठा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय आरक्षण अंतिमरीत्या जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी १५ जानेवारी रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीनुसार प्रभाग निहाय मतदारांचे विभाजन करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून तालुका तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.

प्रभाग निहाय मतदार याद्या गठीत करुन दि.१५ फेब्रुवारी रोजी प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर १५ ते २२ फेब्रुवारी पर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. तर १ मार्च रोजी तयार केलेल्या अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या प्रमाणित करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ८ मार्चला मतदान केंद्राची यादी आणि मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.

Web Title: Nagar Panchayat's bell will ring