उधारी बुडविण्यासाठी रचला लुटमारीचा बनाव; खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 19:31 IST2021-02-20T19:28:31+5:302021-02-20T19:31:03+5:30

गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन जणांनी मारहाण करून दीड लाख रुपयांना लुटल्याची खोटी तक्रार

Misleading the police by filing a false case of robbery | उधारी बुडविण्यासाठी रचला लुटमारीचा बनाव; खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड

उधारी बुडविण्यासाठी रचला लुटमारीचा बनाव; खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड

जालना : दोन जणांनी मारहाण करून दीड लाख रुपयांना लुटल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. समीर पी. शेख जमील (वय २८, रा. दुखीनगर, जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

समीर शेख जमील हा व्यापारी आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन जणांनी मारहाण करून दीड लाख रुपयांना लुटल्याची खोटी तक्रार त्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी व्यापारी समीर पी. शेख जमील याला विचारले असता, त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांना शंका आल्याने त्याला पुन्हा विश्वासात घेऊन विचारले असता, लोकांची उधारी घेतली होती, ती उधारी देता येऊ नये म्हणून हा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
 

Web Title: Misleading the police by filing a false case of robbery