शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या प्रचारार्थ दिग्गज मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:43 IST

भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालना लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी रॅली, कॉर्नर बैठका आणि थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालना लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी रॅली, कॉर्नर बैठका आणि थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात विभागलेल्या या मतदार संघात युतीचे अनेक बडे नेते प्रचारात उतरल्याने रंगत वाढली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात चिकलठाणा, करमाड, सिल्लोड याप्रमाणेच जालना जिल्ह्यातील जालना शहर आणि अन्य तालुक्यांमध्ये प्रचारसभा होत आहे. जालना शहरात मंगळवारी मोठी रॅली काढण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वीच गोकुळनगरीमध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जि. प. सदस्य शालीकराम म्हस्के यांनी कॉर्नर बैठक घेतली. यासह अंबड तालुक्यातही माजी आ. अ‍ॅड.विलास खरात हे वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन दानवेंना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. दानवे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात असल्याने आपण प्रत्येकाने दानवे यांचे दूत म्हणून काम केले पाहिजे. असे आवाहनही अ‍ॅड. खरात यांनी केले.
करमाड येथे पार पडलेल्या प्रचारसभेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत दानवेंच्या प्रचारार्थ बैठक झाली. यावेळी दानवे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी बागडे यांनी केले. या बैठकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, किसान सेनेचे नाना पळसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामूअण्णा नवपुते आदींची उपस्थिती होती. चिकलठाणा येथेही डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे उपाध्यक्ष किशनचंद तनवाणी, आ. अतुल सावे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरूळे, माजी महापौर घडामोडे, बाबासाहेब डांगे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात दानवेंच्या प्रचाराला वेग आला असून, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले, राजेश राऊत आदी कार्यकर्ते प्रचारार्थ गावोगावी दौरे करत आहेत. सिल्लोड येथेही खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सुरेश बनकर यांच्या उपस्थितीत प्रचारसभा झाली. दानवेंनी गेल्या पाच वर्षात सहा हजार कोटी रूपयांचा निधी आणून विकास कामे केल्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे