शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे Exclusive: "आम्ही हक्कांसाठी लढतोय; यावेळी ५ पट समाज मुंबईत धडकणार!"

By विजय मुंडे  | Updated: August 26, 2025 13:25 IST

सरकारने समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु सरकार समाजाच्या भावनांशी खेळत आहे. आज हा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, राज्यातील घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार आहे. मागील वेळेपेक्षा पाच पट अधिक समाज राहणार असून, सरकारने समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

प्रश्न : आपली नेमकी मागणी काय आहे?उत्तर : मराठा आणि कुणबी एक आहे, असा जीआर काढावा. हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्न्मेंट, औंध संस्थानचे गॅझेट लागू करावे. दाखल सर्व गुन्हे घ्यावेत. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि शासकीय निधी द्यावा आदी प्रमुख मागण्या आहेत.

प्रश्न : सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसे शक्य आहे?उत्तर : पूर्वी व्यवसायानुसार नागरिकांच्या नोंदी सरकारी दप्तरी घेतल्या जात होत्या. मराठा समाज शेती करायचा. त्यांना शेतकरी नाही तर कुणबी म्हटलं जायचं. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानसह इतर गॅझेटमध्ये तशा नोंदी आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या नोंदी असून, त्या सरकारने मान्य करणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगानेही त्या नोंदी ग्राह्य धरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे गरजेचे आहे; परंतु आमच्यावर अधिक अन्याय तिथेच झाला आहे.

प्रश्न : आजवर तीन वेळा असे आरक्षण न्यायालयाने नाकारले आहे, तरीही पुन्हा तोच आग्रह का?उत्तर : आम्ही तेच म्हणतोय, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय मागासवर्गीय आयोग ५० टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये, असे सांगते. त्यामुळे आम्हाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे आहे. कुणबी आरक्षणात आहेत. मराठा आणि कुणबी एकच असून, ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे.

प्रश्न : मुंबईला जाण्यासाठी नेमके सणासुदीचे दिवस का निवडले?उत्तर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपण इंग्रजांविरुद्ध लढलो. त्या लढ्यात इंग्रजांविरुद्ध नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यास सुरुवात झाली. आम्ही गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं, सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी लालबागच्या राजाला साकडं घालण्यासाठी जात आहोत. सणात अडथळा होईल, असे वाटत असेल तर आझाद मैदानावर जाण्यासाठी आम्हाला एक रस्ता मोकळा करून द्यावा.

प्रश्न : या मोर्चात किती लोक येतील असा अंदाज आहे?उत्तर : गोरगरीब मराठा समाज पिचलेला आहे. आरक्षणाचा लढा आता तीव्र झाला असून, गावागावांतून तयारी सुरू आहे. गतवेळीपेक्षा यावेळी किमान पाच पट अधिक समाजबांधव येेतील. नव्हे, त्याचे गणितही लावता येणार नाही.

प्रश्न : सर्वांची व्यवस्था कशी आणि कोण करणार?उत्तर : मराठा समाजातील प्रत्येक घरातून मुंबईला जाण्याची तयारी सुरू आहे. वाहने, जेवण यासह इतर सर्व व्यवस्था समाजबांधवच करीत आहेत.

प्रश्न : छगन भुजबळ म्हणतात, तुमची मागणी न्यायसंगत नसताना, लढा कशाला?उत्तर : ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच काही कळत नाही. काही ओबीसींना कशा सुविधा आहेत आणि इतर ओबीसींना कशा आहेत ते त्यांनी सांगावे. राजकीय स्वार्थासाठी सर्वच ओबीसी समाज एका बाजूला पळवीत आहेत. हिंमत असेल त्या नेत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरावी. गरीब ओबीसी समाजाने त्यांचे डाव ओळखले आहेत. राज्यातील धनगर समाज असो किंवा ओबीसी समाज असो, हा मराठ्यांच्या विरोधात नाही.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण