शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाचा दगडाने ठेचून खून; जालन्यात महिनाभरात चौथी हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:55 IST

सासूच्या अंत्यविधीनंतर घरी न परतलेल्या मच्छिंद्र दराडे यांचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला; जालन्यात गुन्हेगारीचा ग्राफ वाढला

जालना: तालुक्यातील गोंदेगाव शिवारात सोमवारी सकाळी एका ५५ वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मच्छिंद्र कोंडीबा दराडे (रा. पाणेगाव, ता. अंबड) असे मृताचे नाव असून, ते आपल्या सासूच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदेगावला आले होते. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, हा खून त्यांच्याच एका जवळच्या नातेवाईकाने केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रात्री निघून गेले अन् घात झालामिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र दराडे हे रविवारी सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. विधी पार पडल्यानंतर ते नातेवाईकांकडेच थांबले होते. मात्र, रात्री ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. सोमवारी सकाळी गोंदेगाव येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे आणि उपनिरीक्षक दिगंबर पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

महिनाभरात चौथा खून; पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?मच्छिंद्र दराडे यांच्या मुलीवर सध्या जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका बाजूला मुलीचे आजारपण आणि सासूचा मृत्यू, अशा दुहेरी संकटात असतानाच मच्छिंद्र यांचा खून झाल्याने कुटुंबावर आभाळ फाटले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, मृताची दुचाकी आणि काही साहित्य जप्त केले आहे. जालन्यात गेल्या महिनाभरात झालेल्या सलग चार खुनांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Son-in-law murdered at mother-in-law's funeral in Jalna; fourth murder this month.

Web Summary : A 55-year-old man was murdered in Jalna while attending his mother-in-law's funeral. Machhindra Darade was found dead near a power station. Police suspect a close relative. This marks the fourth murder in Jalna this month, raising concerns about police effectiveness.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना