शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर महिलाराज : भाजपची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST

टेंभुर्णी : टेंभुर्णी ग्रामपंचायतीत दोन्ही पदांवर महिला विराजमान झाल्याने प्रथमच येथे महिलाराज आले आहे. शुक्रवारी झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत ...

टेंभुर्णी : टेंभुर्णी ग्रामपंचायतीत दोन्ही पदांवर महिला विराजमान झाल्याने प्रथमच येथे महिलाराज आले आहे. शुक्रवारी झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदावर भाजपाच्या सुमन लक्ष्मण म्हस्के, तर उपसरपंचपदावर भाजपाच्याच मनीषा संतोष पाचे यांची निवड झाली आहे.

जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या या ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपने दहा जागा जिंकून एकहाती सत्ता आणली होती. येथील सरपंचपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुमन म्हस्के यांना ११, तर राष्ट्रवादीच्या संध्या कांबळे यांना सहा मते मिळाली, तर उपसरपंच पदासाठी मनीषा पाचे व राष्ट्रवादीचे रवींद्र उखर्डे यांनाही ११-६ मते मिळाली. अपक्ष निवडून आलेले एकमात्र सदस्य राम गुरव यांनी भाजपच्या पारड्यात मतदान केल्याने भाजपचे एक मत वाढले. निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी जि. प. सदस्य शालिकराम म्हस्के, माजी पं. स. सदस्य दिनकर देशमुख, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, माजी उपसरपंच फैसल चाउस, मुक्तारखा पठाण, गौतम म्हस्के, शिल्पा देशमुख, कमल मुळे, चंद्रभागा सोनसाळे, सुशीला कुमकर, संगीता अंधारे, धनराज देशमुख, शिवाजी मुळे, रामकीसन सोनसाळे, सर्जेराव कुमकर, गजानन अंधारे आदींसह भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

फोटो- टेंभुर्णीच्या सरपंचपदी सुमन म्हस्के व उपसरपंचपदी मनीषा पाचे यांची निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह जल्लोष करताना जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के, दिनकरराव देशमुख, फैसल चाऊस, गौतम म्हस्के आदी.