रिमझिम पावसामुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:53 AM2019-08-01T00:53:44+5:302019-08-01T00:54:11+5:30

दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

Living life due to rain | रिमझिम पावसामुळे जीवदान

रिमझिम पावसामुळे जीवदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु, तलाव, विहिरी कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु, दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके जगली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीच केली नव्हती.
घनसांवगी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ११ हजार ७७ हेक्टर एवढे आहे. यातील ९९ हजार ४१५ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. तर उवर्रित क्षेत्र पडीत आहे. तालुक्यातील घनसांवगी, पिंपळगाव, तीर्थपुरी, राणीउंचेगाव, आंतरवाली टेंभी व जांबसमर्थ या सात महसूल मंडळात ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ४९ हजार २१३ हेक्टरवर कापूस, १ हजार ३७० हेक्टरवर बाजरी, १३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ५०१ हेक्टरवर मूग, ४८८ हेक्टरवर मका, ५४ हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे.
दरम्यान, या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरी खत व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, तलाव, विहिरी व कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.
घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात उन्हाळ्यात १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या ४० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील तलाव कोरडेठाक आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

 

Web Title: Living life due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.