जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:11 IST2025-04-22T15:54:18+5:302025-04-22T16:11:16+5:30
Jalna Crime news: जालना जिल्ह्यात असलेल्या फत्तेपूरमध्ये ही घटना घडली आहे. तरुणीची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
Maharashtra Crime: एका १८ वर्षीय तरुणीने प्रियकराकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून आयुष्य संपवले. तुझी बदनामी करेन, अशा धमक्या प्रियकराकडून दिल्या जात होत्या. त्या भीतीपोटी कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल आघामसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर गावात ही घटना घडली आहे. १८ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रियकराच्या घरात सापडला मृतदेह
जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यात फत्तेपूर गाव आहे. १८ वर्षीय तरुणीने बदनामी करण्याच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली. शिवानी गिरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
वाचा >>डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे शिवानी गिरी या तरुणीचा मृतदेह तिचा प्रियकर विशाल आघाम याच्याच घरात सापडला. त्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणात आता शिवानी आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केला आहे.
शिवानीला तिचा प्रियकर विशाल आघाम याने बदनामी करण्याची धमकी दिली होती. कशासंदर्भात धमक्या दिल्या जात होत्या, याबद्दल पोलीस तपास करत आहेत. भोकरदन पोलीस ठाण्यात विशाल आघाम आणि त्याच्या चार मित्रांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.