शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात १० कुष्ठ, ४२ क्षयरोग रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:49 IST

सर्वेक्षणात आतापर्यंत १० कुष्ठरोग तर ४२ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संयुक्त कुष्ठ रुग्ण, सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू असून, या सर्वेक्षणात आतापर्यंत १० कुष्ठरोग तर ४२ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात संयुक्त कुष्ठ रुग्ण, क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी १३ सप्टेंबरपासून सर्वेक्षण सुरु असून, २८ सप्टेंबरपर्यंत ते चालणार आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील १८ लाख २८ हजार १४० नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.आशा सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन नमुने घेण्यात येत आहेत. कुष्ठ रुग्णांच्या शोधासाठी त्वचेचे; तसेच इतर नमुने घेतले जात आहेत. क्षयरोगासाठी थुंकीचे नमुने तपासले जात असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली.आतापर्यंतच्या सर्वेक्षणात कुष्ठरोगाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार त्यांना औषधोपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. क्षयरोगाचे आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुण्यात जवळपास ४२ रुग्ण आढळले आहे. हे सर्वेक्षण १ आॅक्टोबरपर्यंत चालणार असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कडले, क्षयरोग अधिकारी जायभाय करीत आहेत.कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरूकता अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात १८ लाख २८ हजार १३० नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ लाख १७ हजार ७५२ नागरिकांची तपासणी झाली आहे. यात ३ हजार ४६ संशयित कुष्ठरुग्ण रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० रुग्ण बाधित आहेत तर क्षयरोगाचे ८८९ एवढे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicinesऔषधं