शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

कानफोडीच्या ‘बिजल्या’ची ११ लाखांत विक्री; शेतकरी पवन राठोड एक बैल विकून झाले लखपती

By अझहर शेख | Updated: November 6, 2025 13:18 IST

बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते

अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, वाटूर (जि. जालना): मंठा तालुक्यातील कानफोडी येथील शेतकरी पवन राठोड हे एक बैल विकून लखपती झाले आहेत. या कुशल शेतकऱ्याने पट्ट्यावरील धावणाऱ्या बैलाचे पालन-पोषण केले आणि त्याला उत्कृष्टरीत्या प्रशिक्षित करून तयार केले. त्यानंतर तो ‘बिजल्या’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्यात घोड्यालाही घाम फोडणारी ताकद असल्याचे बोलले जात होते.

बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल ११ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केला.

बिजल्याने ३० पैकी जिंकल्या २५ शर्यती

शंकरपटात शर्यतीत घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिले स्थान पटकावले. जालना, वाशीम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील ३० पैकी २५ शर्यतींमध्ये बिजल्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, ३ ते ४ लाख रुपये कमाई केली आहे.

सोशल मीडियावर ३ हजार फॉलोअर्स

‘बिजल्या’ आता सोशल मीडियावरही चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर रील पोस्ट होताच ३ हजार फॉलोअर्स झाले.  ५ सेकंदात ६० पॉइंट धावत मराठवाड्यात तरी अद्वितीय ठरला आहे.

तामिळनाडूतून ५१ हजारांना केली होती खरेदी

राठोड यांनी १० महिन्यांचा असताना तामिळनाडू येथून ५१ हजारांत त्याची खरेदी केली होती. १५ महिन्यांत त्याला आहारात रोज ३ लिटर दूध, १०० ग्रॅम बदाम, एक किलो उडीदडाळ, सायंकाळी मका व गहू भरडा दिला. दर दोन दिवसांनी गरम पाण्याने अंघोळ घालत निगा राखली. बैलावर प्रेम, नियमित प्रशिक्षण आणि काळजी घेतल्यामुळेच बिजल्या इतका मौल्यवान झाला. मेहनत आणि चिकाटीने एखाद्या प्राणी किंवा शेतीतील उत्पादनातून मोठा लाभ मिळवता येतो, असे पवन राठोड यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Becomes Lakhpati: 'Bijlya' Bull Sold for ₹1.1 Million

Web Summary : Farmer Pawan Rathod became a lakhpati after selling his trained bull, 'Bijlya', for ₹1.1 million. Bijlya, known for winning 25 of 30 races, was purchased from Tamil Nadu for ₹51,000 and meticulously cared for, proving profitable farming through dedication.
टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी